तारे जमीन पर च्या गाण्यांचा अनुवाद करायचा थोडा प्रयत्न केला .. पण एवढी सुंदर ती कलाकृती आणि त्यातली ती साधी सोपी मधुर हिंदी यांकडे पाहुन मलाच लाज वाटायला लागली .. की आपण हे काय करतोय .. गुलजारांच्या गाण्यांचा अनुवाद जसा भयंकर कठीण जातो तसेच प्रसून जोशींचे आहे .. त्यांच्या सोप्यासरळ गोड भाषेला माझ्याकडे शब्दच नसतात .. तरी प्रयत्न केलेची पाहिजे ... :-D
"मा"
मी तसा कधी सांगत नाही
पण अंधाराला भितो आई मी
मी तसा कधी दाखवत नाही
तुझी काळ्जी करतो आई मी
तुला सगळं माहित आहे ना आई
तुला सगळं माहित आहे ना ..
गर्दीत या ,असं सोडु नको मला
घरीसुद्धा नाही येउ शकेन गं आई
एवढ्या दूर पाठवू नको मला
आठवणसुद्धा नाही येणार गं आई
इतका का मी वाईट आहे गं आई
इतका का वाईट...
जेव्हा कधी बाबा मला
जोरात झोका देतात गं आई
शोधतो तुलाच मी
येउन जवळ घेशील नं आई
त्यांना मी कधी म्हणत नाही
पण बावरून जातो मी आई
चेहऱ्यावर येउ देत नाही
मनात घाबरुन जातो मी आई
तुला सगळं माहित आहे ना आई
तुला सगळं माहित आहे ना ..
डोळेही आता चुप झाले
चुप झाले बोल माझे
काही दुखतही नाही आता
काही जाणवतही नाही आता
तुला सगळं माहित आहे ना आई
तुला सगळं माहित आहे ना ..
"तारे जमीन पर"
बघा ही असती, कोमल , दवबिंदुहुन
पानांच्या कुशीत येती थेट अस्मानातुन
आळोखे देऊन कूस बदलती
नाजूक मोती खुदकन घसरती
हरवू नये हे तारे मातीमधे
सुखद उन थंडीतले, हीच तर असती
येउन अंगणाला , सोनेरी सजवती
अंधार मनाचा पळवून नेती
थंडगार हातांना जीवन देती
हरवू नये हे तारे मातीमधे ...
जशी नयनकुपीत , गेली झोपी , आणि झोपेतल्या गोडश्या स्वप्नी
आणि स्वप्नात भेटे देवदूतच जणू
जशी रंग भरली पिचकारी , जशी फ़ुलपाखरं ती बावरी
जसं निर्मळ , निरागस नातंच जणू
ही तर आशेची किरणे
जणू नवी सकाळ उगवणे
जणु आनंद भरून वाहणे
हरवू नये हे तारे मातीमधे ...
रातराणीच्या अंगावर बघा हे
रोमांच बनुनी उगवले
फ़ुलांच्या सुगंधासम
बागेतुन पळाले
जणू बांगड्यांचे कंगोरे
जणू हसरे फ़ुलांचे चेहरे
जणू बासरी वाजवी
झाडाखाली कुणी रे
ही तर झुळुक वाऱ्याची
घुंगराची छनछन जीवनाची
ही सरगम ह्या निसर्गाची
हरवू नये हे तारे मातीमधे ...
1 comment:
Hey Abhijeet ,
I really liked all of your poems.
Great work, keep it up
Post a Comment