Monday, November 24, 2008

थोडा खुदसे बात करो

थोडा खुदसे बात करो, दिल खिल जाता है
अकेलापन दोस्त की तरह घुलमिल जाता है

दिल ही दिल मे इतना रोए है अब तक
छलकता आंसू आंखो मे ही सिल जाता है

पता नही कौनसे आसमां की आस है ये
तेरे ही सपनो के कोहरे मे ये दिल जाता है

तुने कोई आशा दिखाई भी तो न थी कभी
जाने क्यूं फ़िर निराशा से मन छिल जाता है

कितनी दफ़ा सोचा है, तुझपे कुछ न लिखू
लब्जों के कतरे कतरे मे तूही मिल जाता है

Friday, November 21, 2008

पहिली भेट

तुझे आज भेटणे
अन माझे बस्स
अनिमिष पाहणे..

तू सहजच बोलणे
अन मा कवीला
शब्दच न सुचणे

तू कोवळेसे हसणे
माझे अचूकपणे
सर्व मोती झेलणे

घड्याळात पाहणे
मनात नसूनही
निरोप चाचपणे

पहिल्या भेटीचा
उत्साह आवरणे
पुन्हा भेटायचे
स्वप्न पालवणे

Thursday, November 13, 2008

कधी कधी काहीही वाटतं

कधी कधी काहीही वाटतं

आकाशाला न्याहाळावं वाटतं
जमिनीला कुरवाळावं वाटतं
सुरांमधे विरघळावं वाटतं
शब्दांवाटॆ ओघळावं वाटतं

मनापासून प्रेम करणारी
तिजवर उगा रुसावं वाटतं
तिला कावरंबावरं पाहून
जवळ घेउन बसावं वाटतं

स्वतःशीच बोलता बोलता
गावभर एकटंच हिंडावं वाटतं
गप्पांचा अड्डा जमवून
पत्त्यांचा डाव मांडावं वाटतं

ह्रुषिकेश मुखर्जींच्या अमर
आनंद सारखं जगावं वाटतं
हसता हसता रडवणाऱ्या
आठवणी देउन मरावं वाटतं

Friday, November 7, 2008

मन कधी

मन कधी
विचारांची सावली
स्वप्नांची माउली
ओळखिची चाहूल
प्रत्येकच पाउली

मन कधी
अधांतरी अस्तित्व
अपरिचित स्वत्व
मकरंदी शत्रुत्व
तिरस्कृत मित्रत्व

मन कधी
शून्यातली नजर
थबकलेलं शहर
काळाच्या हातून
निसटणारा प्रहर

मन कधी
निळंशार आकाश
बरसता सारांश
मायेनी बांधलेला
जमिनीचा पाश

Wednesday, November 5, 2008

तुझी आठवण

तुझी आठवण
प्रश्नांची पाखरण
हव्याशा उत्तरांची
देवाला आळवण

तुझी आठवण
विचारांची पतंग
अस्मानी शोधते
इंद्रधनुषी रंग

तुझी आठवण
सुरेल साठवण
मनाच्या दारावर
फ़डफ़डते तोरण

तुझी आठवण
अनिर्बंध ध्यास
धडधडते छातीत
कधी रोखते श्वास