Wednesday, September 30, 2009

अशीच एक संध्याकाळ ..

काल रुसलेली तू ..
खळखळत्या धारेतून
अचानक झाली अबोली तू ..

अन माझी नजर भिरभिरी ..
तुझा श्वास शोधतेय ..
तुझा भास अनुभवतेय..

मी ही निघालोय गाडीवर..भरकटतोय..
परत परत फ़ोन चाचपून पाहतोय ..
भलत्याच कुणाचा मेसेज पाहून तगमगतोय ..

असंच स्वैर हिंदकळत.. वाऱ्यावर स्वार होऊन..
पान घरात शिरतं.. अन डोळे मिटून गादीवर निखळतं ..

तितक्यात मेसेजटोन ऐकू येते..
अन सगळं अस्तित्व एकवटून मी उठतो..
फ़ोन मधे तुझं नाव पाहून परत आकाशात विहरतो ........ [:)]

-- अभिजित गलगलीकर

Monday, September 7, 2009

मी नं आताशा कोणावर रागवत नाही ..

मी नं आताशा कोणावर रागवत नाही ..
तुझ्यावर नाही ..
माझ्यावर नाही ..
त्या रेंगाळलेल्या ढगावर पण नाही ..

जो फ़क्त हुलकावणी देऊन जातो ..
थोडं भिजवून मनातला चातक जागवून जातो...
अन मग येतच नाही ..

काल त्या ढगात तुझा चेहरा दिसला होता...
पण तरी मी हसून हात केला तुला ...
तुला खोटं वाटेल .. पण .. मी नं आताशा कोणावर रागवत नाही ..