प्रेम नितळ करायचे
प्रेम निश्चल करायचे
सर्वव्यापी प्रेम करायचे
अखंडित त्या प्रेमाला व्यापायचे
प्रेम शाश्वत करायचे
प्रेम सारस्वत करायचे
अपार सुंदर प्रेम करायचे
भव्य मंदिर प्रेमाचे स्थापायचे
प्रेमावर प्रेम करायचे
ह्या मनावर प्रेम करायचे
त्याच्या उगमावर प्रेम करायचे
मिलनरुपी अस्तावर प्रेम करायचे
प्रेम तिच्यावर करायचे
तिच्या कणांकणांवर करायचे
आयुष्याच्या कणाकणांनी करायचे
No comments:
Post a Comment