हातातून सटकलं काहीतरी
मी वेगात गाडीवर ..
तिच्या विचारांच्या ओघात ...
खण्णकन आवाज आला
कळलंच नाही काय झालं
काच तुटून पडली होती ..
विखरल्या गेली होती ..
आरश्याकडॆ पाहिलं मी
पण तो तर जागेवरच ..
काय पडलं मग ते ...
बहुतेक बहुतेक ..
मनातलं स्वप्नं निखळलं होतं..
नकळत अलगद ..
उचकटल्या गेलं होतं ..
मारली तरी पुढली मजल ..
दिलं ते तसंच सोडून ..
परत येताना थांबलो ..
तुकड्यांमधे नशिब शोधत..
ते स्वप्न परत जुळवत बसलो ..
1 comment:
सुंदर अगदी वेगळीच कविता .
मी आता ऋतुरंग वर माझ्या दादाचया कविता डाकायला सुरवात केली आहे . अभिप्राय आवडेल.
Post a Comment