सतत सहज मनात तू
आठवांच्या रानात तू
स्वतःहून जास्त जपलेल्या
पिंपळपानात तू
खोडकर आभास तू
लहरी मनाची आरास तू
उगाचच वाटणारा
आत्मविश्चास तू
स्वप्नांची पालवी तू
आकाशाची दिशा नवी तू
अवखळ निरागस
पण मनस्वी तू
शब्दा शब्दात तू
अर्था अर्थात तू
मी माझा न उरलो
मम स्वार्थातही तू
No comments:
Post a Comment