डोळ्यात तुझाच ओलावा
ओठांवर तुझेच ग गाणे
मनाच्या अख्ख्या आभाळभर
तुझ्याच विचारांचे तराणे
तुझी आठवण, मैत्रिण
तुझी आठवण, हळवी
सहज चारचौघातून
मला अगदी दूर पळवी
जिथे जिथे जात असतो
तुझी साद वेचत असतो
कधी गप्पांमधे चुकून
तुझेच नाव घेत असतो
ध्यास तू, स्वप्न तू, सत्य तू
नशिबाने दाखवलेले अगत्य तू
असं नक्कीच वाटतं मला,
मागल्या जन्मीचे सत्कृत्य तू
1 comment:
वा, क्या बात है .
Post a Comment