तुझ्या माझ्यात
तुझं माझं
असं उरलंच नाहीये ..
मनाच्या आकाशात..
विचारांच्या नकाशात..
श्वासांच्या चंदनात..
प्रेमाच्या स्पंदनात,
अगदी कणाकणांत
आपलेपण सामावलंय..
मोरपंखी स्पर्शात
मृद्गंधी श्वासात
खुदकन हसण्यात
अबोल लाजण्यात
सगळं आयुष्य,
भविष्य सामावलंय ..
म्हणूनच म्हंटलं ..
आता आपल्यातलं
सगळं तुझं माझं विरलंय ....
अन अलवार प्रेम साकारलंय .. [:)] ..
-- Abhijit Galgalikar ..
No comments:
Post a Comment