Thursday, January 15, 2009

सावल्या

सावल्या असतात, आठवणींच्या
कितीही हाकललं तरी जात नाहीत..
लोचट असतात अगदी ..
पिंडाभोवती पिंगा घालणाऱ्या
कावळ्यांसारख्या...
मला काय वाटतं ..
त्या सावल्यांचेच कावळे होत असावेत बहुतेक ...
मेल्यावरही घोटाळणाऱ्या सावल्या ...

No comments: