Thursday, February 5, 2009

ओलेते काव्य

सांगु तुला?
गुज मनाचं
तुझ्या माझ्या
एकपणाचं

गोऱ्या स्वप्नांची
निळी ओढणी
तुझ्या रुपाने
अवाक पापणी

तुझ्या भेटीचे
मृद्गंधी क्षण
मनी जपलेले
सोनसळी कण

ओलेते काव्य
झरतं प्रेम
शब्द संपुनही
उरतं प्रेम

1 comment:

Janpune said...

ओलेते काव्य
झरतं प्रेम
शब्द संपुनही
उरतं प्रेम


keval apratim !!!