Wednesday, May 6, 2009

मन

मनाचा गुंता
भव्यदिव्य
कधी असह्य
कधी अपसव्य

मनाची बोली
अमृतवेल
कधी सुरेल
कधी बनेल

मनातले विचार
कृष्णविवर
कधी अनावर
कधी गहिवर .. 

तर मन म्हणजे ..
मन म्हणजे
रुपगर्विता.. 
कधी लख्ख सविता 
कधी मूक कविता .. 

No comments: