Sunday, May 17, 2009

'मी

माझ्यात लपलेला
'मी' शोधायचाय
तुझ्यात गुंतलेला
'मी' सोडवायचाय.. 

म्हणताय तुम्ही
सावर लवकर तू
अहो मला अजून
'मी' आवरायचाय.. 

आठवणींचे काव्य
रो्ज रचत असतो
आता त्यातून वेचून
'मी' रेखायचाय .. 

आव्हान आहे,.. मान्य.. 
आज ते पेलायचंय ..  
अगदी मोकळं होऊन 
'मी' वाहायचंय ... 



1 comment:

Janpune said...

.................!!!