Tuesday, October 7, 2008

दिल ढूंढता है , फ़िर वही होस्टेल के रात दिन

गुलजारांची एक अतिशय सुंदर रचना , दिल ढूंढता है .. फ़िर वही फ़ुरसत के रात दिन .. होस्टेल चे काही क्षण त्या शब्दांमधे गुंफ़ण्याचा एक प्रयत्न .... त्यांनाच हे विडंबन(?) अर्पण ... ...

दिल ढूंढता है , फ़िर वही होस्टेल के रात दिन
बैठे रहे आलस-ए-बहाना किए हुए

मेस की सर्द रोटी और कच्चे चावल लेकर
गले पे सिंचकर भरे पानी के ग्लास को
निकल पडे मेसवाले को गाली देते हुए

या एक्झाम्स की रात जो नाईट मारना चले
ठंडी उदास बूक्स को रटे देर तक
यारों के संग पढते रहे रूम पर पडे हुए

शर्मिली सर्दियों मे, किसी भी कॉर्नर पर
बातों मे गुंजती हुई खामोशियां सुने
आंखों मे दो चमकीले से सपने लिए हुए

-- अभिजित ...

Sunday, October 5, 2008

विचित्र कविता - ५

पाणी पाणी ..
कुणीतरी कण्हत होतं
रस्त्याच्या कडेला
काहीतरी होतं ..
पटकन बिसलेरी घेतली..
आणि गेलो घेउन ...

तिथे पाहतो काय ..
ते कुणाचं तरी मन होतं..
उध्वस्त झालं होतं
तरी म्हणत होतं ..
हे दे .. ते दे ..
आणि आणि .........

Friday, October 3, 2008

दुआ

माना के तुझमे पहलेसे जजबात न सही
किसीसे उल्फ़त,मुझसे मुहब्बत न सही

पिछा करता रहता है यादों का काफ़िला
भागते रहो,हर तरफ़ वही रास्ता मिला
रुका रहूंगा उस एक नये मोड पे हमेशा
कुछ दिनो बाद तुझे मेरी जरूरत न सही
किसीसे उल्फ़त,मुझसे मुहब्बत न सही..

हल्के कोहरे सा घिरा रहता है अतीत
दो कदम चल,मिलेगी सुनहरीसी प्रीत
किसी और के लिए तो खुद को सजा तू
महरूम मुझ मे शायद वो बात न सही
किसीसे उल्फ़त,मुझसे मुहब्बत न सही..

करवटें पूछेंगी गर मेरा पता तुमसे कभी
याद तो रहेंगी ना,चंद बातें जो कही कभी
तेरे मुस्कुराने की ही दुआ मैने मांगी है
हसते हसते फ़िर मै तुझे याद न सही ..

Sunday, September 28, 2008

विचित्र कविता - ४

हातातून सटकलं काहीतरी
मी वेगात गाडीवर ..
तिच्या विचारांच्या ओघात ...

खण्णकन आवाज आला
कळलंच नाही काय झालं
काच तुटून पडली होती ..
विखरल्या गेली होती ..

आरश्याकडॆ पाहिलं मी
पण तो तर जागेवरच ..
काय पडलं मग ते ...
बहुतेक बहुतेक ..
मनातलं स्वप्नं निखळलं होतं..
नकळत अलगद ..
उचकटल्या गेलं होतं ..
मारली तरी पुढली मजल ..
दिलं ते तसंच सोडून ..

परत येताना थांबलो ..
तुकड्यांमधे नशिब शोधत..
ते स्वप्न परत जुळवत बसलो ..

Thursday, September 25, 2008

स्वप्न म्हणजे..

स्वप्न म्हणजे..
मुठीत धरलेले पाणी
नभांत उरलेली गाणी
कितीदा संपली तरी
नव्याने चालणारी कहाणी

स्वप्न म्हणजे..
धुकं ल्यायली चांदरात
अल्लड गवताची पात
मनाच्या देव्हाऱ्यामधे
सांजेला तेवणारी वात

स्वप्न म्हणजे..
आशेचं उंच अस्मान
कधी निराशेचं गर्द रान
वास्तवाला शह देऊन
अथांग हरपलेले भान