Wednesday, September 30, 2009

अशीच एक संध्याकाळ ..

काल रुसलेली तू ..
खळखळत्या धारेतून
अचानक झाली अबोली तू ..

अन माझी नजर भिरभिरी ..
तुझा श्वास शोधतेय ..
तुझा भास अनुभवतेय..

मी ही निघालोय गाडीवर..भरकटतोय..
परत परत फ़ोन चाचपून पाहतोय ..
भलत्याच कुणाचा मेसेज पाहून तगमगतोय ..

असंच स्वैर हिंदकळत.. वाऱ्यावर स्वार होऊन..
पान घरात शिरतं.. अन डोळे मिटून गादीवर निखळतं ..

तितक्यात मेसेजटोन ऐकू येते..
अन सगळं अस्तित्व एकवटून मी उठतो..
फ़ोन मधे तुझं नाव पाहून परत आकाशात विहरतो ........ [:)]

-- अभिजित गलगलीकर

Monday, September 7, 2009

मी नं आताशा कोणावर रागवत नाही ..

मी नं आताशा कोणावर रागवत नाही ..
तुझ्यावर नाही ..
माझ्यावर नाही ..
त्या रेंगाळलेल्या ढगावर पण नाही ..

जो फ़क्त हुलकावणी देऊन जातो ..
थोडं भिजवून मनातला चातक जागवून जातो...
अन मग येतच नाही ..

काल त्या ढगात तुझा चेहरा दिसला होता...
पण तरी मी हसून हात केला तुला ...
तुला खोटं वाटेल .. पण .. मी नं आताशा कोणावर रागवत नाही ..

Wednesday, July 22, 2009

तुझ्या विचारांत..

पावसात,
मन गुंतलं,
तुझ्या श्वासात..

विचारांचे रान,
स्वप्नांचे प्राण,
तुझ्या ध्यासात ..

हळवी पापणी,
हसरी जिवणी,
तुझ्या आठवांत..

अवेळी जागणं,
सुगंधी मोहरणं,
तुझ्याशी बोलण्यात..

आकाशात राहणं,
नकळत लिहिणं,
तुझ्या विचारांत..

- अभिजित गलगलीकर ..

Thursday, July 2, 2009

सब नया नया है

नई जिंदगी ..नया सफ़र ..
नयी राहें, तुम हमसफ़र..

नया विश्वास, नई उम्मीद..
नये सुर, तुम पावन संगीत..

नया आसमां , नया बादल
नई उडान, साथी तुम्हारा आंचल.

नई उमंग , नई आशाएं
तुम्हे दर्शाती हथेली की नई रेखाएं..

सब नया नया है , क्यूंकी ...
गिर पडी है केंचुली पुराने जिस्म की..
तुम ही गवाह हो इस मंगल रस्म की ..

Saturday, June 13, 2009

हिरवेगार पान...

कधी तरण्या फ़ांदीवर
ऐटीत झुलणाऱ्या दिवसांची ....

मीही जातो वाऱ्यावर उडत
त्या क्षणांमधे परत ..
सळसळतं रक्त अनुभवतो परत ..
खळबळतं मन अनुभवतो परत ..

माझं फ़ूल दिसतं, हसरं लाजरं..
डोळ्यांत आसुसलेलं स्वप्न गोजिरं ..

आठवतात वादळं..
अस्तित्व उखडवणारी..
भोवतीची पाने उडवणारी ...

अचानक एक इवलंसं पान बिलगतं मला..
अन जाणीव होते,
अजूनही मी फ़ांदीवर असल्याची ..
माझ्या सावलीची गरज असल्याची ...



(असंच इथल्या एका आजोबांकडॆ पाहून कविता सुचली ... आपल्या नातीला घेऊन रोज फ़िरायला जातात... कडेवर घेऊन चालतात... थकून बसतात थोड्या वेळ ...
परत हसून उठतात ... अजूनही हिरवेगार आहे त्यांचे पान... )