Wednesday, May 7, 2008

अशीच ती .. तशीच ती ..

असेल कधी नसेल कधी
सर्वत्र मला भासेल कधी

उगीच भांडून रुसेल कधी
अल्लड कळीगत हसेल कधी

सहज गप्पा रंगवेल कधी
नकळत अबोला खुलवेल कधी

चालेल कधी नाचेल कधी
चिंब मनात सचैल कधी

मावळत्या मलूल क्षणावर
चांदणी होऊन उगवेल कधी

बनेल कधी खोडेल कधी
स्वप्नांमधे उंच उडेल कधी

चौकटीमधे न मावेल कधी
पाशमुक्तही न राहवेल कधी

अशीच ती , तशीच ती
काही म्हणा खाशीच ती
अगदी बेछूट सुरेल ती
काय जाणे माझी होईल कधी........ ...


---- अभिजित ......... ७-५-२००८

No comments: