असं वाटतं तुझ्या कुशीत शिरून
मनमोकळं रडावं , पाझरावं..
हुंदक्यांचा ढग घेऊन यावं अन
तु्झ्या ओटीत पूर्ण रितं व्हावं..
पण तुझी जमीन दिसली की
माझं आभाळ बरसतच नाही ..
मनात तुझं हसू झिरपतं
माझंही स्मित आवरतच नाही ...
पण एकदा रडायचंय..
तुझा हात केसात फ़िरवून घ्यायचाय
नंतर कधी आलंच रडू तर
आसवं थोपवण्याचा धीर घ्यायचाय ...
No comments:
Post a Comment