Tuesday, October 21, 2008

स्वप्नं

निळ्याशार नदीत
स्वप्नं तरंगती
लपाछपी खेळती
ढगांच्या संगती

उलगडती धुकं
क्षितिज साकारती
उंच नभातूनी
मनाला हाकारती

हसती उन्हासम
अंधाराला टोकती
मुक्या आसवांना
मेघांतच रोखती

अनोखी नवरंगी
उत्फ़ुल्ल चमकती
पूर्णत्वाची आशा
मनात ठसवती ..

No comments: