Saturday, October 25, 2008

रेशमओळी

इतकी सवय झालीय तुझी
थोडा वेळ ही रहावत नाही
मनाला दचकवल्याशिवाय
आठवणींना रहावत नाही

फ़क्त तुझ्याच विचारांचं
अख्ख्या मनात सारवण गं
विसरावं म्हंटलं तरीही
हट्टी तुझी आठवण गं

कोवळ्या सकाळी सुचल्या
तुझ्यामुळे रेशमओळी
काय जाणे का वाहते आहे
मंजुळ मृदुल हवा भोळी

No comments: