मन कधी
विचारांची सावली
स्वप्नांची माउली
ओळखिची चाहूल
प्रत्येकच पाउली
मन कधी
अधांतरी अस्तित्व
अपरिचित स्वत्व
मकरंदी शत्रुत्व
तिरस्कृत मित्रत्व
मन कधी
शून्यातली नजर
थबकलेलं शहर
काळाच्या हातून
निसटणारा प्रहर
मन कधी
निळंशार आकाश
बरसता सारांश
मायेनी बांधलेला
जमिनीचा पाश
1 comment:
फारच सुंदर . मन असतं खरं अजब .
Post a Comment