कधी कधी काहीही वाटतं
आकाशाला न्याहाळावं वाटतं
जमिनीला कुरवाळावं वाटतं
सुरांमधे विरघळावं वाटतं
शब्दांवाटॆ ओघळावं वाटतं
मनापासून प्रेम करणारी
तिजवर उगा रुसावं वाटतं
तिला कावरंबावरं पाहून
जवळ घेउन बसावं वाटतं
स्वतःशीच बोलता बोलता
गावभर एकटंच हिंडावं वाटतं
गप्पांचा अड्डा जमवून
पत्त्यांचा डाव मांडावं वाटतं
ह्रुषिकेश मुखर्जींच्या अमर
आनंद सारखं जगावं वाटतं
हसता हसता रडवणाऱ्या
आठवणी देउन मरावं वाटतं
No comments:
Post a Comment