सुमंगल नात्याची
सोनसळी पहाट
अथांग स्वप्नांचा
अनिमिष थाट
रुपेरी वचनात
बोलका आनंद
बंधनं तोडून
सजला मुक्तछंद
प्रथमेषाला वंदून
सुरु्वात प्रवासाची
सहजच लाभेल
साथ उत्कर्षाची
नवे सूर,नवी तान
नवे कोवळे तराणे
छान जुळुन येईल
सुरेल जीवनगाणे
दादा - वहिनीला साक्षगंधानिमित्य छोटीशी शब्दभेट ..
No comments:
Post a Comment