पहाट बिलगली
खुदकन हसली
दिवसाची शाळा
पटांगणी बसली
मग उन्हं येतात
थोडी उब देतात
ओसाड जीवाला
मृगजळ देतात
सांजही बोलावते
सलगीने बोलते
ओझरता शहारा
आठवण ओलावते
रात्र तर मैत्रीणच
उंच आकाशात नेते
दोन स्वप्नं दाखवून
वास्तवात आणते
मीही असाच हिंडतो
सगळ्यांसोबत उनाड..
सोवळा , कलंदर ..
कोवळासा पहाड ..
1 comment:
रात्र तर मैत्रीणच
उंच आकाशात नेते
दोन स्वप्नं दाखवून
वास्तवात आणते
मस्तच.
Post a Comment