आठवणींची ओलेती सय
थोडी तुलाही, थोडी मलाही
अलवार स्वप्नांची सवय
थोडी तुलाही, थोडी मलाही
कालच्या बोलण्याची आच, ओली अजून
पुढच्या फ़ोनची साद , कोवळी अजून
ऎकवून जाते, स्मितभर
थोडी तुलाही, थोडी मलाही
मनाच्या गुदगुल्या क्षणभर सुखवती
उगा बेचैन होऊन, स्वप्नं जागवती
छळती नुसतं रात्रभर
थोडं तुलाही, थोडं मलाही
सगळीकडे कुजबुज आपल्या दोघांची
आता वाट मुक्त भिजवणाऱ्या मेघांची
परत भेटीची आतुरता
थोडी तुलाही, थोडी मलाही .. ..
-- अभिजित ... २१-४-२००८
1 comment:
आपल्या कविता छान आहेत. मला आवडल्या. असेच लिहीत रहा. धन्यवाद.
- वामन
Post a Comment