एक ना दोन ..
भाराभार चिंध्या
मनाच्या..अस्तित्वाच्या
त्या बेचव शुचित्वाच्या...
संपलं का सगळं
मेलं पुर्ण की तगलं..
काही असो ..
मला तरी नवीन जन्म मिळणार
रिसायकल झालोय अख्खा मी
तनाने मनाने
सगळ्या परिमाणाने
नव्याने जुन्याने
नवनीत तळ्यासारखा
खुलल्या गळ्यासारखा....
1 comment:
abhijit u really r a good poet. toooo good yaar
Post a Comment