चलता रहता हूं इस साहिल पे
आपकी यादें लहरें बनकर मिलती है
देखता रहता हूं उस फ़लक को
जहां आप चांदनी बनकर मिलती है
यादें तो बन चुकी है साया मेरा
धीरे से पिछे पिछे चलती है
मुडके देखूं तो कोई नही रहता
यूंही मुझे तरसाती रहती है
इस गीली सी रेत पर मै खडा
पांव के निचे से वो सरकती हुई
विश्वास है मेरे ही बनोगे तुम
फ़िर भी लगता है जाँ छुटती हुई ..
I am as elusive, as you allow me to be.. I am as opaque, as you read me more.. I am as possesive, as you claim on me.. I am as fluent, as you ease me.. I am as impossible, as memories try to erase me ..
Wednesday, May 28, 2008
Sunday, May 18, 2008
सुरमई साद..
सुरमई साद , नवीन क्षणांची
कोवळी उब, उगवत्या किरणांची
मुक्त रंग उधळत दिवस उमलला
चिंब भिजत नखशिखांत सजला
मंगल वर्षा होतेय स्वप्नसुमनांची
सुरमई ...
सावळी सांज लाजत सावरत येते
अवखळ अल्लड,धुंद बावरत येते
ऎकवते आठवण निर्मळ कवनांची
सुरमई ...
हळवी रात्र जागवी अलवार स्वप्नं
पळभर न चैन, उधळी स्मृतीरत्नं
सांगते गोष्ट दोन हळूवार मनांची
सुरमई ...
कोवळी उब, उगवत्या किरणांची
मुक्त रंग उधळत दिवस उमलला
चिंब भिजत नखशिखांत सजला
मंगल वर्षा होतेय स्वप्नसुमनांची
सुरमई ...
सावळी सांज लाजत सावरत येते
अवखळ अल्लड,धुंद बावरत येते
ऎकवते आठवण निर्मळ कवनांची
सुरमई ...
हळवी रात्र जागवी अलवार स्वप्नं
पळभर न चैन, उधळी स्मृतीरत्नं
सांगते गोष्ट दोन हळूवार मनांची
सुरमई ...
Tuesday, May 13, 2008
निःशब्द कविता
कोवळी, मनसोवळी तू
अलवार सोनसळी तू
करवंदी , जास्वंदी तू
सुवासिक मृद्गंधी तू
सावनी , अस्मानी तू
सौंदर्य आरस्पानी तू
आशा , अभिलाषा तू
स्वप्नांची परिभाषा तू
माझी निःशब्द कविता तू
ओतप्रोत भाव-सरिता तू
-- अभिजित ... १३-५-०८ ..
अलवार सोनसळी तू
करवंदी , जास्वंदी तू
सुवासिक मृद्गंधी तू
सावनी , अस्मानी तू
सौंदर्य आरस्पानी तू
आशा , अभिलाषा तू
स्वप्नांची परिभाषा तू
माझी निःशब्द कविता तू
ओतप्रोत भाव-सरिता तू
-- अभिजित ... १३-५-०८ ..
Sunday, May 11, 2008
तस्वीर बनाता हूं - विडंबन
एक अजून विडंबन घेऊन हजर बघा ....
...
तस्वीर बनाता हू .. तस्वीर नही बनती .. इक ख्वाबसा देखा है .. ताबीर नही बनती ... तलत मेहमूदचं दैवी गाणं ऍक्चुअली .. त्याची माफ़ी अगोदर... त्याचा स्वभाव थोडा तापट होता म्हणे .. हे खालचं वाचून मला एखाद्या तस्वीरमधे बांधून नदीत फ़ेकलं असतं त्यानी ..
...
असो आपल्यामधे बऱ्याच जणांना शाळेमधे चित्रकला हा अत्यंत गनिमी विषय छळून गेला असेल ... माझी आणि तुमचीही.. ही कहाणी समजा ...
...
दिनभर बनाता हूं तस्वीर नही बनती
छास कभी एकदम पनीर नही बनती
बेदर्द कॅनव्हास का इतना सा है अफ़साना
गाय लगे भैंस , खुदको मैने न पहचाना
इसे और बिगाडने की तदबीर नही बनती
व्हाईटनर लेके मेरी दुनिया मे चले आओ
रोते हुए चित्रों को फ़िरसे थोडा हसा जाओ
मुझसे तो अब ये हालत देखी नही बनती
दिनभर बनाता हूं तस्वीर नही बनती
छास कभी एकदम पनीर नही बनती .....
-- अभिजित रेघोट्यामारे ... ( दिनांक < सद्य वेळ )

तस्वीर बनाता हू .. तस्वीर नही बनती .. इक ख्वाबसा देखा है .. ताबीर नही बनती ... तलत मेहमूदचं दैवी गाणं ऍक्चुअली .. त्याची माफ़ी अगोदर... त्याचा स्वभाव थोडा तापट होता म्हणे .. हे खालचं वाचून मला एखाद्या तस्वीरमधे बांधून नदीत फ़ेकलं असतं त्यानी ..

असो आपल्यामधे बऱ्याच जणांना शाळेमधे चित्रकला हा अत्यंत गनिमी विषय छळून गेला असेल ... माझी आणि तुमचीही.. ही कहाणी समजा ...

दिनभर बनाता हूं तस्वीर नही बनती
छास कभी एकदम पनीर नही बनती
बेदर्द कॅनव्हास का इतना सा है अफ़साना
गाय लगे भैंस , खुदको मैने न पहचाना
इसे और बिगाडने की तदबीर नही बनती
व्हाईटनर लेके मेरी दुनिया मे चले आओ
रोते हुए चित्रों को फ़िरसे थोडा हसा जाओ
मुझसे तो अब ये हालत देखी नही बनती
दिनभर बनाता हूं तस्वीर नही बनती
छास कभी एकदम पनीर नही बनती .....
-- अभिजित रेघोट्यामारे ... ( दिनांक < सद्य वेळ )
तब बात बनी...
ख्वाबों की सब्जी, तमन्नाओं की चटनी
सच्चाई का तडका लगा, तब बात बनी
ये पल मे खुश रहो, आनेवालेका क्या पता
गम को लाथ मारो, जानेवालेकी क्या खता
रोते रोते फ़ट से हस दिया ,तब बात बनी
इस दिल ने बडा तरसाया, अब क्या कहूं
रुलाया हसाया बहकाया , सब क्या कहूं
खुल्ला आजाद छोड दिया, तब बात बनी
आज कल यूंही चांद का ख्वाब देखता हूं
वो तो सिर्फ़ हसता है, मै भी हस देता हूं
अब सब, रब पे छोड दिया, तब बात बनी
--- अभिजित गलगलीकर .... ११ - ५ - २००८
सच्चाई का तडका लगा, तब बात बनी
ये पल मे खुश रहो, आनेवालेका क्या पता
गम को लाथ मारो, जानेवालेकी क्या खता
रोते रोते फ़ट से हस दिया ,तब बात बनी
इस दिल ने बडा तरसाया, अब क्या कहूं
रुलाया हसाया बहकाया , सब क्या कहूं
खुल्ला आजाद छोड दिया, तब बात बनी
आज कल यूंही चांद का ख्वाब देखता हूं
वो तो सिर्फ़ हसता है, मै भी हस देता हूं
अब सब, रब पे छोड दिया, तब बात बनी
--- अभिजित गलगलीकर .... ११ - ५ - २००८
Wednesday, May 7, 2008
अशीच ती .. तशीच ती ..
असेल कधी नसेल कधी
सर्वत्र मला भासेल कधी
उगीच भांडून रुसेल कधी
अल्लड कळीगत हसेल कधी
सहज गप्पा रंगवेल कधी
नकळत अबोला खुलवेल कधी
चालेल कधी नाचेल कधी
चिंब मनात सचैल कधी
मावळत्या मलूल क्षणावर
चांदणी होऊन उगवेल कधी
बनेल कधी खोडेल कधी
स्वप्नांमधे उंच उडेल कधी
चौकटीमधे न मावेल कधी
पाशमुक्तही न राहवेल कधी
अशीच ती , तशीच ती
काही म्हणा खाशीच ती
अगदी बेछूट सुरेल ती
काय जाणे माझी होईल कधी........
...
---- अभिजित ......... ७-५-२००८
सर्वत्र मला भासेल कधी
उगीच भांडून रुसेल कधी
अल्लड कळीगत हसेल कधी
सहज गप्पा रंगवेल कधी
नकळत अबोला खुलवेल कधी
चालेल कधी नाचेल कधी
चिंब मनात सचैल कधी
मावळत्या मलूल क्षणावर
चांदणी होऊन उगवेल कधी
बनेल कधी खोडेल कधी
स्वप्नांमधे उंच उडेल कधी
चौकटीमधे न मावेल कधी
पाशमुक्तही न राहवेल कधी
अशीच ती , तशीच ती
काही म्हणा खाशीच ती
अगदी बेछूट सुरेल ती
काय जाणे माझी होईल कधी........

---- अभिजित ......... ७-५-२००८
Monday, May 5, 2008
अनिमिष आस...
मनाला जगायची अनिमिष आस असू दे
या घरात तुझीच देखणी आरास असू दे
तूच मनमंदिरातले चित्पावन निरांजन
या ज्योतीस कधी न लागो कणभर लांछन
शांत तेवणारा,कोवळासा एक श्वास असू दे
...
आयुष्य अजुन काय,तुझेच सुरमयी गीत
प्रत्येक समेवर सुस्वर नांदते अपुली प्रीत
तुजसवे नाचता मंजुळ पदन्यास असू दे
...
शब्दाशब्दातून साकरायचंय मूर्त तुला
अर्थाअर्थातून समजायचंय सार्थ तुला
माझ्या हर कवितेला तुझाच प्रास असू दे
...
--अभिजित -- ४-५-०८
या घरात तुझीच देखणी आरास असू दे
तूच मनमंदिरातले चित्पावन निरांजन
या ज्योतीस कधी न लागो कणभर लांछन
शांत तेवणारा,कोवळासा एक श्वास असू दे
...
आयुष्य अजुन काय,तुझेच सुरमयी गीत
प्रत्येक समेवर सुस्वर नांदते अपुली प्रीत
तुजसवे नाचता मंजुळ पदन्यास असू दे
...
शब्दाशब्दातून साकरायचंय मूर्त तुला
अर्थाअर्थातून समजायचंय सार्थ तुला
माझ्या हर कवितेला तुझाच प्रास असू दे
...
--अभिजित -- ४-५-०८
Thursday, May 1, 2008
जपानी कविता ..
हे हे .. नाव वाचून गंडलात ना ... अहो काय झालं की २ महिने टोकियो ला राहण्याची संधी मिळाली ... आणि बरंच सांगून झालं इकडून तिकडून की जपान वर लिहा लिहा .... आळशीपणात ते ढकललं पुढे पुढे ..पण आता आम्हालाच इकडून ढकलून देण्याचा कट रचला जातोय .. त्याना यश मिळायच्या आधी लिहून घ्यावं म्हंटलं ...
... चला तर मग थोडं 'गुण'गान करावं.... जास्त टवाळक्या करू नयेत म्हणे कुणाच्या .. त्यात हे तर आमचे अन्नदाता ...
(आम्ही अजूनही भारतीय जेवणच घेतो .. बरेच प्रयत्न झाले आम्हाला जपानीझ खाऊ घालण्याचे .. पण आमच्या(की त्यांच्या) अरसिक चवीमुळे आम्ही ते शिताफ़ीने परतवून लावले ..
)
असो . खुप विषयांतर झालं .. चला मग जय निहोन ... हे जपानचे दुसरे नाव .. लाडके म्हणा लागल्यास.. याचा अर्थ म्हणजे उगवता सूर्य .. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतातच ना ..
..
हे काही शब्द जपानच्या झुंजार वृत्तीला अर्पण ...
देशाविषयी कुठल्या ,काय बरं मी लिहावे
नतमस्त्तक होऊन,आईस या मी पूजावे
थकतील निहोनप्रती तुमच्या बहू कल्पना
अशी नितांत मेहनत अन प्रखर देशभावना
आदर औचित्य वाखाणण्यासारखे इथले
नम्रपण आगळे जाणण्यासारखे इथले
उगवत्या सुर्यासम लढाऊ मनोवृत्ती
मध्यान्हासम चौकस चिकित्सक वृत्ती
संध्येसारखी गोरी नटमोगरी वेशवृत्ती
निशेसारखी सहज चंचल खिलाडूवृत्ती
नेत्रदीपक तंत्रज्ञान सहज सजवती
रुसुबाई निसर्गाला लीलया मनवती
थोडं रोबोटसारखे अतिसुरळीत जीवन
पण यातच दडलंय त्यांच यशसंजीवन
देशाविषयी या अजून काय बरं मी लिहावे
इथल्या वास्तव्याचे हे सुंदर क्षण रोज वेचावे
-- अभिजित - १-५-२००८ ..



असो . खुप विषयांतर झालं .. चला मग जय निहोन ... हे जपानचे दुसरे नाव .. लाडके म्हणा लागल्यास.. याचा अर्थ म्हणजे उगवता सूर्य .. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतातच ना ..

हे काही शब्द जपानच्या झुंजार वृत्तीला अर्पण ...
देशाविषयी कुठल्या ,काय बरं मी लिहावे
नतमस्त्तक होऊन,आईस या मी पूजावे
थकतील निहोनप्रती तुमच्या बहू कल्पना
अशी नितांत मेहनत अन प्रखर देशभावना
आदर औचित्य वाखाणण्यासारखे इथले
नम्रपण आगळे जाणण्यासारखे इथले
उगवत्या सुर्यासम लढाऊ मनोवृत्ती
मध्यान्हासम चौकस चिकित्सक वृत्ती
संध्येसारखी गोरी नटमोगरी वेशवृत्ती
निशेसारखी सहज चंचल खिलाडूवृत्ती
नेत्रदीपक तंत्रज्ञान सहज सजवती
रुसुबाई निसर्गाला लीलया मनवती
थोडं रोबोटसारखे अतिसुरळीत जीवन
पण यातच दडलंय त्यांच यशसंजीवन
देशाविषयी या अजून काय बरं मी लिहावे
इथल्या वास्तव्याचे हे सुंदर क्षण रोज वेचावे
-- अभिजित - १-५-२००८ ..
Subscribe to:
Posts (Atom)