Saturday, January 26, 2008

देस रंगिला रंगिला - अनुवाद

नमस्कार मित्रानो .. तुम्हा सगळ्याना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा!!

'फ़ना' चित्रपटातील प्रसून जोशी लिखित 'देस रंगिला' या गाण्याचा अनुवाद तुमच्या समोर सादर करतोय ... जमल्यास मूळ चालीवर म्हणुन बघा... ...

प्रत्येक पावली इथे धरा बदलते रंग
इथल्या बोली जणु रांगोळीचे सात रंग
हिरव्या पगडीत ऋतु सजले
निळ्या चादरीत आकाश दडले
नदी सोनेरी
हिरवा सागर
गोड हा सजला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

लाल लाल गालांचा सूर्य करतो बघा खोडी
लाजर्‍या शेतांची बावरी पिवळी ही ओढणी
रंगली ओढणी
रंगीत अंगणी
रंग हा उधळला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

अबिर गुलालाचे चेहरे इथे
मस्त अशी ही टोळी
रंग हास्याचे , रंग खुशीचे
नात्यांची जणू होळी
कथांचे रंग
शपथांचे रंग
स्नेहरंग दाटला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

प्रेमाचा रंग इथे गहिरा
चढल्यावर ना उतरे
सच्च्या प्रेमाचा पक्का रंग
पसरे पण ना विखुरे
रंग साजाचा
रंग लाजेचा
सुंदर शर्मिला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

Thursday, January 24, 2008

काळ...

हर एक क्षणावर काळाचे राज्य आहे
तुमचं आणि त्याचं नातं अविभाज्य आहे

काळ म्हणा,नियती म्हणा, वा अजुन काही
न थांबता,ठरल्या मार्गाने तो चालत राही
खेळू नका तयासंगे,फ़ारच तो व्रात्य आहे
हर एक क्षणावर...

क्षण सुटला हातून,परत तो येणे नाही
काळाची देण होती ती, परत तो देणे नाही
या खेळात त्याच्या आळशीपणा त्याज्य आहे
हर एक क्षणावर...

प्रसन्न असेल तर ,काळ झरझर सरतो
रागावला तर, तुम्हांस जर्जर करतो
क्षणात राजा , क्षणात भिकारी
क्षणात रया , क्षणात लाचारी
हाक प्रेमळ त्याची , शिवी मात्र अर्वाच्य आहे

हर एक क्षणावर काळाचे राज्य आहे
तुमचं आणि त्याचं नातं अविभाज्य आहे

Tuesday, January 22, 2008

माझ्या सगळ्या मित्रांसाठी ...

मन की बात न सुन सके वो यार नही
आंखो से बात न पढ सके वो यार नही
चार नज्मे यारी पे जो ना लिख सके
लिखे सैकडो मे खाक , वो शायर नही ...

To all my friends -->

कहते जाउ तो खत्म ना होती बात सा दोस्त
मेरे लिये तो जैसे, पुरे कायनात सा दोस्त

सुस्त पानी को चंचल बनाता,कंकड सा दोस्त
गप्पे लडाता हुआ , गली के नुक्कड सा दोस्त

थमी जिंदगी मे आती मिठी हिचकी सा दोस्त
गम का नशा उतारता किसी साकी सा दोस्त

मुरझाई रुत मे , बरसती धूप सा दोस्त
बिन बोले , बडबडाता हुआ , चूप सा दोस्त

अंधेरी राहो मे संभालता, इक दिये सा दोस्त
जीत की चकाचौंध से बचाता,इक साये सा दोस्त

मस्तीयो के रोज एक नये किस्से सा दोस्त
करीब इतना, परिवार के हिस्से सा दोस्त
गलती हो कोई ,खुब डांटता, भाई सा दोस्त
बेशकिमती ऐसा , पहली कमाई सा दोस्त

Thursday, January 17, 2008

कोई ये कैसे बताए - स्वैर अनुवाद

"कोई ये कैसे बताए" ह्या कैफ़ी आझमींच्या सुरेख गाण्याचा मी करुन पाहिलेला एक स्वैर अनुवाद ... तुम्हास आवडेल अशी अपेक्षा..

कुणी कसे सांगावे तो एकटा का आहे
जो आपला होता तो दुसऱ्याचा का आहे

असेच हे जग तर असे हे जग का आहे
असेच जर होते तर असे होते का आहे

एकदा धरेल हात तर,ठेवेन तिचीच आस
तिज ह्रदयात सामावेल माझा हर एक श्वास
इतके जवळ असुनही हा दुरावा का आहे

भग्न या हृदयात राहतंय अजुनही कुणी
उध्वस्त घरात डोकावतंय अजुनही कुणी
आस जी तुटली कधीच , जागवते का आहे

तु आनंदाचं म्हण किंवा दुःखाचं , हे नातं
म्हणतात जन्मापार असतं हे प्रेमाचं नातं
जन्मापार जर हे नातं , तर बदलते का आहे

Friday, January 11, 2008

असंच काहीतरी...

वाटलं यार, आज खरं खरं बोलुया
थोडं हळवं , जरासं बावरं बोलुया

बोचेल स्वतःचच मुळ रुप कुणाला
माणुसपणाचा मुखवटा बाजुला ठेवुया

चला चिक्कार देणग्या देऊ मंदिराना
देवालाही काळा भागीदार बनवुया

यत्र तत्र सर्वत्र मस्त खाऊ रे पैसे
माणुस असुन माणसालाच खाउया

कुणाचं होऊ दे रे गोलंसं वाट्टोळं
चल आपण गोडसं प्रेमगीत आळवुया

इथे फ़ायदा, तिथे मिळण्याची आशा
नको तिथे उगाच कशाला फ़िरकुया

तसेही कुणीच काही करत नाही
नुसतेच एकमेकाना हिप्पोक्रॅट म्हणुया