Tuesday, July 29, 2008

बडा खुशनसीब लगता ये साल है

मै ऐसा क्यूं हूं , अच्छा सवाल है
हर जवाब एक नया ही बवाल है

हाल-ए-दिल बताया नही जाता
हसती आंखों मे छुपा मलाल है

दिन और रात, वोही मेरे साथ है
आते हुए सवरे का वो खयाल है

तुम्हारे लिए हसती ये कलम है
पढके तुम्हारा मुस्कुराना कमाल है

आखों मे सुखा पडा है इस बार
बडा खुशनसीब लगता ये साल है

Saturday, July 26, 2008

untitled ..

आसमां ने पुकारा था
मै भी यूं ही चल दिया
जमीं ने हाथ थामा था
टूटा कंगन चूभ गया

वक्त भी उस निशानी से
जख्म सहलाता गया
चांद साथ ले घुमता हूं
दर्द थोडा ठंडा पड गया

कभी कभी अदिती .. अनुवाद प्रयत्न ..

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अशात कुणी कसे रोखावे आसवांचे झोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..

कधी कधी वाटतं, जगण्यात नाही उरली काहीच मजा
कधी कधी वाटतं, दिवसातला प्रत्येक क्षण एक सजा
अशा हदयात कसे पडावे हास्याचे ठोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..

करतात बघ तुजवर किती प्रेम सगळे
रडतो आम्हीही जर तुझे आसू वाहिले
गाणं येत नाही तरी आम्ही गाऊन पाहिले
अदिती , मानलं जग कधी अंधारलेलं वाटतं
पण रात्रीनंतरच नाही का हे आभाळ उजाडतं

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू अता
नाही तर बन ना थोडी थोडी थोडी थोडी थोडीश्शी स्मिता

तू खुश आहेस तर बघ जग सुंदर दिसतं
सूर्य ढगातून येउन जगात जगणं पसरवतो
ऐक बेभान वारा तुला येउन काय सांगतो
की अदिती, दूर गेलेले परत एकदा भेटतात
अदिती तू बघ , ही फ़ुलं नक्की परत फ़ुलतात

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू अता
नाही तर बन ना थोडी थोडी थोडी थोडी थोडीश्शी स्मिता

Sunday, July 20, 2008

सांजकविता - ३

आज सांज झुरते आहे
एकलीच सरते आहे
रितं रितं आकाश,पण..
मनात ती उरते आहे

क्षितिजाचे रक्तिम कुंकू
तिचं मळवटच जणू
नवरंगी स्वप्नं लेवते
मुक्तछंदी सांजच जणू

पापण्यांत स्वप्नलाटा
कड किंचित ओलावते
आकाशाला पुसून डोळे
मन अलगद सैलावते ... [:)]

Wednesday, July 16, 2008

पण एकदा रडायचंय.. - in reply to kavyanjali thread

असं वाटतं तुझ्या कुशीत शिरून
मनमोकळं रडावं , पाझरावं..
हुंदक्यांचा ढग घेऊन यावं अन
तु्झ्या ओटीत पूर्ण रितं व्हावं..

पण तुझी जमीन दिसली की
माझं आभाळ बरसतच नाही ..
मनात तुझं हसू झिरपतं
माझंही स्मित आवरतच नाही ...

पण एकदा रडायचंय..
तुझा हात केसात फ़िरवून घ्यायचाय
नंतर कधी आलंच रडू तर
आसवं थोपवण्याचा धीर घ्यायचाय ...

Sunday, July 13, 2008

निःशब्द मी तुझ्याकाठी

शब्द माझे तुझ्यासाठी
निःशब्द मी तुझ्याकाठी

किनारा शोधायचाय
कुणाचा ते माहित नाही
एक जमीन दृष्टिपथात
बहुधा ती शापित नाही
तेवढंच , तेवढंच
एक सांत्वन मनासाठी ...

स्वप्नं शेवटी काचेचीच
एखाद दुसरं तुटायचंच
तुझं माझं काय त्यात
नुकसान थोडं व्हायचंच
विसरावं अन हसावं
हा न तो, स्वतःचसाठी ..

कडू गोड , खारट तुरट
शब्द असेही तसेही ..
सगळे तुझ्याचसाठी
लिहिलेत तुझ्याच
आयुष्याच्या चवीसाठी..
लिहिलेत फ़क्त , कारण
निःशब्द मी तुझ्याकाठी ..

Saturday, July 12, 2008

स्वप्नांशी बोलणारी तू.. - raahoolda's thread...

स्वप्नांशी बोलणारी तू..
स्वप्नांत बावरणारी तू
स्वप्नं माळणारी तू
स्वप्नं सावरणारी तू

स्वप्नं पालवणारी तू
स्वप्नं भासवणारी तू
स्वप्नं जागवणारी तू
स्वप्नं आवरणारीही तू

स्वप्नं जुळवणारा मी
स्वप्नं सांधणारा मी
स्वप्नापार गेलो की
स्वप्नं तोडणारा मी


#2


स्वप्नांच्या पारंब्या
खुप ताणू नयेत
झोका घ्यावा पण
हात सोडू नयेत

दिलाच तर द्यावा
आधार मनापासून
ओठातून नको, दे
श्वासांच्या मुळापासून

उंच उडत गेल्यावर
दम लागायला नको
हसत सुरु जो प्रवास
स्मित थकायला नको

स्वप्नांची परिक्षा दे
पेपर पूर्ण सोडवायला
तयारीच नसेल त्याची
शून्य नको मिरवायला


#3

मनाच्या आकाशी
स्वप्नांचं चांदणं
एखादीच अवस
परत अथांग
निळसर नांदणं..

उगवेल अजुनी
नवा एक तारा
मोहवेल तुज
हसशील तू ही
काढून टाकशील
पापणीतला हा
बेचव कचरा ..


#4

रात्र आली , रात्र गेली
स्वप्नं मात्र खोळंबली
ह्या कप्प्यात, त्या कोपर्‍यात
मनाच्या भन्नाट पसार्‍यात
सगळीकडे जाऊन दडली
अन माझीच खोडी काढली..
हाकलून दिलं सगळ्यांना
तरी परत आली ...
आता मात्र कोंडून टाकली..
बंद बंद .. बस्स..


आज ती खोली उघडली
डोळे विस्फ़ारून बघत
परत येऊन बिलगली ..
स्वप्नंच होती .. बहुतेक ...

Thursday, July 10, 2008

सांजकविता - २

एक शांत संध्याकाळ
कणखर किनाऱ्याचा
अवचित तो प्रवाळ ..

सूर्यबिंब रक्ताळलेलं
उगा त्यात भासतं
दुःख साकळलेलं

बेभान लाटा बेफ़ाम
स्थिर उभा मी इथे
शरीर धडधडीत, पण
पोखरलं फ़क्त मन इथे ..

Wednesday, July 2, 2008

जगाल कसं..

जगाल कसं , जगाल कसं
जगाला धरून हाणाल असं
ऎकावं तर एकूण एकाचं
करावं, पहातच रहाल असं
जगाल कसं..

एका पाठोपाठ एक परिक्षा
एखादं बक्षीस, अनंत शिक्षा
सगळे वार झेलूनही उभे रहा
मारेकऱ्याला लाजवाल असं
जगाल कसं ...

धडपडलात कधी,सावरून घ्या
वाट कुणाची? स्वतः आवरून घ्या
एकटेच व्हा भक्कम खंबीर
दुसऱ्याना आधार व्हाल असं
जगाल कसं ...

माणसं जोडत चला वाटेने
मग वाट कधी चुकणार नाही
इंधन पुरेपूर असू द्या प्रेमाचं
शेवटपर्यंत सोबत रहाल असं
जगाल कसं ...

माज नको उगा कशाचा
अभिमान जरूर सत्याचा
थोडेसे नम्र असावे नक्कीच
पुढला आदराने नमेल असं
जगाल कसं ...

हारजीत चालूच असते इथे
गाडी जिंकूनच थांबते इथे
कारणं नकोत अभिजितला
निघा आता,युद्धाला जाल असं..

जगाल कसं , जगाल कसं
जगाला धरून हाणाल असं.......

Tuesday, July 1, 2008

सांजकविता - १

आज तू आलीस
सहज आत शिरलीस
'हाय' केलंस हसरं
खळखळतं जिवंत असं..
काय गप्पा रंगल्या
कुठल्याशा विषयात दंगल्या..
मग एकदम कुठुन तरी
सांजझुळुका किणकिणल्या..

"आता येते" म्हणलीस
तुला बाय करण्यात
तुझ्या वळत्या नजरेत
श्वास अडकून गेला..
अन मुठीत अडकलेला
काळ सुटून गेला ..