Sunday, May 18, 2008

सुरमई साद..

सुरमई साद , नवीन क्षणांची
कोवळी उब, उगवत्या किरणांची

मुक्त रंग उधळत दिवस उमलला
चिंब भिजत नखशिखांत सजला
मंगल वर्षा होतेय स्वप्नसुमनांची
सुरमई ...

सावळी सांज लाजत सावरत येते
अवखळ अल्लड,धुंद बावरत येते
ऎकवते आठवण निर्मळ कवनांची
सुरमई ...

हळवी रात्र जागवी अलवार स्वप्नं
पळभर न चैन, उधळी स्मृतीरत्नं
सांगते गोष्ट दोन हळूवार मनांची
सुरमई ...

Tuesday, May 13, 2008

निःशब्द कविता

कोवळी, मनसोवळी तू
अलवार सोनसळी तू

करवंदी , जास्वंदी तू
सुवासिक मृद्गंधी तू

सावनी , अस्मानी तू
सौंदर्य आरस्पानी तू

आशा , अभिलाषा तू
स्वप्नांची परिभाषा तू

माझी निःशब्द कविता तू
ओतप्रोत भाव-सरिता तू

-- अभिजित ... १३-५-०८ ..

Sunday, May 11, 2008

तस्वीर बनाता हूं - विडंबन

एक अजून विडंबन घेऊन हजर बघा .... ...

तस्वीर बनाता हू .. तस्वीर नही बनती .. इक ख्वाबसा देखा है .. ताबीर नही बनती ... तलत मेहमूदचं दैवी गाणं ऍक्चुअली .. त्याची माफ़ी अगोदर... त्याचा स्वभाव थोडा तापट होता म्हणे .. हे खालचं वाचून मला एखाद्या तस्वीरमधे बांधून नदीत फ़ेकलं असतं त्यानी .. ...

असो आपल्यामधे बऱ्याच जणांना शाळेमधे चित्रकला हा अत्यंत गनिमी विषय छळून गेला असेल ... माझी आणि तुमचीही.. ही कहाणी समजा ... ...


दिनभर बनाता हूं तस्वीर नही बनती
छास कभी एकदम पनीर नही बनती

बेदर्द कॅनव्हास का इतना सा है अफ़साना
गाय लगे भैंस , खुदको मैने न पहचाना
इसे और बिगाडने की तदबीर नही बनती

व्हाईटनर लेके मेरी दुनिया मे चले आओ
रोते हुए चित्रों को फ़िरसे थोडा हसा जाओ
मुझसे तो अब ये हालत देखी नही बनती

दिनभर बनाता हूं तस्वीर नही बनती
छास कभी एकदम पनीर नही बनती .....


-- अभिजित रेघोट्यामारे ... ( दिनांक < सद्य वेळ )

तब बात बनी...

ख्वाबों की सब्जी, तमन्नाओं की चटनी
सच्चाई का तडका लगा, तब बात बनी

ये पल मे खुश रहो, आनेवालेका क्या पता
गम को लाथ मारो, जानेवालेकी क्या खता
रोते रोते फ़ट से हस दिया ,तब बात बनी

इस दिल ने बडा तरसाया, अब क्या कहूं
रुलाया हसाया बहकाया , सब क्या कहूं
खुल्ला आजाद छोड दिया, तब बात बनी

आज कल यूंही चांद का ख्वाब देखता हूं
वो तो सिर्फ़ हसता है, मै भी हस देता हूं
अब सब, रब पे छोड दिया, तब बात बनी


--- अभिजित गलगलीकर .... ११ - ५ - २००८

Wednesday, May 7, 2008

अशीच ती .. तशीच ती ..

असेल कधी नसेल कधी
सर्वत्र मला भासेल कधी

उगीच भांडून रुसेल कधी
अल्लड कळीगत हसेल कधी

सहज गप्पा रंगवेल कधी
नकळत अबोला खुलवेल कधी

चालेल कधी नाचेल कधी
चिंब मनात सचैल कधी

मावळत्या मलूल क्षणावर
चांदणी होऊन उगवेल कधी

बनेल कधी खोडेल कधी
स्वप्नांमधे उंच उडेल कधी

चौकटीमधे न मावेल कधी
पाशमुक्तही न राहवेल कधी

अशीच ती , तशीच ती
काही म्हणा खाशीच ती
अगदी बेछूट सुरेल ती
काय जाणे माझी होईल कधी........ ...


---- अभिजित ......... ७-५-२००८