Wednesday, July 2, 2008

जगाल कसं..

जगाल कसं , जगाल कसं
जगाला धरून हाणाल असं
ऎकावं तर एकूण एकाचं
करावं, पहातच रहाल असं
जगाल कसं..

एका पाठोपाठ एक परिक्षा
एखादं बक्षीस, अनंत शिक्षा
सगळे वार झेलूनही उभे रहा
मारेकऱ्याला लाजवाल असं
जगाल कसं ...

धडपडलात कधी,सावरून घ्या
वाट कुणाची? स्वतः आवरून घ्या
एकटेच व्हा भक्कम खंबीर
दुसऱ्याना आधार व्हाल असं
जगाल कसं ...

माणसं जोडत चला वाटेने
मग वाट कधी चुकणार नाही
इंधन पुरेपूर असू द्या प्रेमाचं
शेवटपर्यंत सोबत रहाल असं
जगाल कसं ...

माज नको उगा कशाचा
अभिमान जरूर सत्याचा
थोडेसे नम्र असावे नक्कीच
पुढला आदराने नमेल असं
जगाल कसं ...

हारजीत चालूच असते इथे
गाडी जिंकूनच थांबते इथे
कारणं नकोत अभिजितला
निघा आता,युद्धाला जाल असं..

जगाल कसं , जगाल कसं
जगाला धरून हाणाल असं.......

1 comment:

Unknown said...

are sundar kavita..... apun to tera fan hoy gaya...fan matlab ekdam super fan.....!