Saturday, June 13, 2009

हिरवेगार पान...

कधी तरण्या फ़ांदीवर
ऐटीत झुलणाऱ्या दिवसांची ....

मीही जातो वाऱ्यावर उडत
त्या क्षणांमधे परत ..
सळसळतं रक्त अनुभवतो परत ..
खळबळतं मन अनुभवतो परत ..

माझं फ़ूल दिसतं, हसरं लाजरं..
डोळ्यांत आसुसलेलं स्वप्न गोजिरं ..

आठवतात वादळं..
अस्तित्व उखडवणारी..
भोवतीची पाने उडवणारी ...

अचानक एक इवलंसं पान बिलगतं मला..
अन जाणीव होते,
अजूनही मी फ़ांदीवर असल्याची ..
माझ्या सावलीची गरज असल्याची ...



(असंच इथल्या एका आजोबांकडॆ पाहून कविता सुचली ... आपल्या नातीला घेऊन रोज फ़िरायला जातात... कडेवर घेऊन चालतात... थकून बसतात थोड्या वेळ ...
परत हसून उठतात ... अजूनही हिरवेगार आहे त्यांचे पान... )