बोलशील ना मज संगे, सखे तू
ऎकवशील ना ह्रुदयगीत मज एक दिन तू
आजकाल फ़ितुर झाली स्वप्नही तुला
राहशील ना त्या स्वप्नमहाली एक दिन तू
जपेन तुझ्या आसवांना मोत्यांसारखे
त्या शिंपल्याचा अवसर मज देशील ना तू
थांबवेन या काळाच्या प्रवाहाला
या अनोख्या संगमास देशील ना प्रत्यक्ष रुप तू
काळोख्या रात्री मी चंद्र पेटवत आहे
चांदणी बनून करशील ना मज सोबत तू
उधळेन आनंदाचे रंग सगळीकडे
त्या होळीचे निमित्त बनशील ना तू
बस,या फ़कीर मनाच्या खुप इच्छा नाही
फ़क्त चिरकाल साथ देणारी आठवण बनशील ना तू
1 comment:
मालक, तुमच्या कवितेला गझलेचा बाज आहे. असेच लिहित रहा.
मला आवडलेला शेर.
उधळेन आनंदाचे रंग सगळीकडे
त्या होळीचे निमित्त बनशील ना तू
आपला
अजून एक अभिजित.
Post a Comment