Friday, June 1, 2007

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला

पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला

चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला

देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला

मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला

शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

2 comments:

Deepak Salunke said...

Mitra...kavita faarach chaan lihili aahes...avadali mala...tujha blog pahun aanand vatala...

अरविंद said...

अभिजित,

फारच "अप्रतिम" लेखन आहे तुझे.
ती आणि तू यावरच लिहिलेल्या कवितांमधे किती विविधता आहे !

---खुपच आवडली कविता.