आयुष्य उजळवणाऱ्या त्या प्रकाशाला ओळखा
तमोवृत्ती सोडून कर्तृत्वाच्या दिवसाला ओळखा
नटश्रेष्ठांच्या क्षणिक पराक्रमावर काय जाता
त्या पडद्यामागच्या खऱ्या माणसाला ओळखा
स्वप्नं पाहायला कोण नाही म्हणतंय
पण झेपेची उंची दाखवणाऱ्या आकाशाला ओळखा
या बहुरुपी दुनियेत अनेक मुखवटे भेटतील
खरं रुप असलेल्या डोळ्यांच्या आरशाला ओळखा
आपण हरतोय म्हणून इतरांवर काय जळता
शुन्यातून जिंकवणाऱ्या प्रयत्नांच्या पावसाला ओळखा
शर्यतीला जिवघेणी हेच विशेषण का लावता
आधी प्रतिस्पर्ध्यात लपलेल्या माणसाला ओळखा
1 comment:
एक नविन ओळख----
अभिजित,
खूप सुन्दर मांडलेस.
तुझ्या सर्वच कवितांनी मी प्रेरित होतो.
खुपच "अप्रतिम" कविता आहे रे अभिजित.
वा ! किती छान लिहितोस ?
Post a Comment