Tuesday, July 2, 2013

उत्तराखंड


उत्तराखंड पूरामधे सगळं गमवलेल्या एका माणसाचे हे चार शब्द.. 

(वृत्त - पृथ्वी). 

नवीन जगणे, जुनीच वचने, अनोखी कथा
असाध्य वळणे, असह्य रुदने अनोखी व्यथा
निसर्ग रुसला, अथांग हसला, लपावे कसे
अतर्क्य घडले, विचार थकले, जगावे कसे

तमास स्फ़ुरली, विचित्र कविता, म्हणावी कशी
मनात रुतली, अशी भयकथा, जगावी कशी
कसे क्षणभरात स्वप्न खचले, धुके दाटले
पराजित मनात खोलवर हुंदके दाटले

लिखाण करता, अचानक मनात स्वप्नांजली
कितीक रडणार, देउ चल मूक श्रध्दांजली
पुरे शुकशुकाट, घेउ उब शीत आचेतुनी
उधाण उसळेल, खेचु नव जन्म राखेतुनी

-- अभिजित गलगलीकर
- २-७-२०१३

1 comment:

KattaOnline Marathi Blog said...

उत्तराखंडमधील भयानक थैमानात सर्वस्व गमावणाऱ्यांच्या व्यथा काव्य स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न!