Tuesday, March 18, 2008

प्रेम म्हणजे नेमकं काय बरं असतं......

प्रेम म्हणजे नेमकं काय बरं असतं
थोडंसं हळवं ,थोडंसं बावरं असतं

प्रेम म्हणजे चंचल काजळ नव्हे
पापण्यांत दडवलेला सोनुला थेंब असतं
दोन तरल मनांतनं साकारलेलं
एकमेकांच्या डोळ्यातलं प्रतिबिंब असतं

प्रेम म्हणजे आठवणींचे गर्द रान
नकळत सुटावं असं अवचित भान
अंतर्मनाची जणु सुरेल ती तान
अवखळ चांदणं मनातलं ते गोरंपान

प्रेम म्हणजे फ़क्त कविकल्पना नसतं
चारोळीत मावेल अशी वल्गना नसतं
मी तरी अजुन काय काय सांगू
कल्पनातीत, शब्दातीत, विलक्षणा असतं

-- अभिजित गलगलीकर (१८-३-२००८)

1 comment:

मोरपीस said...

खरच हेच असतं का प्रेम?