काय हे उमगले , मी या तनात नाही
भाग्य हे असे , माझे ते न कधी
जीवन हे असे , त्याचा मी न कधी
सगळ्यांचा मी आहे , माझं कुणी नाही
आनंद एवढाच ,कुणाच्या मी दुःखात नाही
काय आज झाले ...
जगत राहण्याची सवय फ़ार जुनी
हसत राहण्याची सवय फ़ार जुनी
अश्रू आमचे एवढे अनमोल नाही हो
म्हणुनच कधी हा श्वास हुंदक्यात नाही
काय आज झाले ...
उगा का मी हे लिहत बसावे
उगा आठवणी आळवत बसावे
ख्ररं तर मस्त गोड गोड लिहत रहावे
या कवितेला कसला काही रीत-भात नाही
काय आज झाले , मन मनात नाही ....
मलाच माहीत नाही मी ही कविता का लिहिलीय ..

No comments:
Post a Comment