Saturday, February 16, 2008

अवसेच्या रात्रीचं गुपित ..

चैतलीच्या अमावस्येच्या रात्रीवरील कवितेला लिहिलेलं हे उत्तर .. ..

घुसमटते रात्र दर अवसेला
आपल्या प्रियकराच्या शोधात
कावरीबावरी फ़िरते
ताऱ्यांची दारं ठोठावते
कुठेच नाही हे पाहून
रडू फ़ुटते तिला
जणु तिच्या आसवांनी
आकाश चक्क धुतल्या जाते
लख्ख दिसते, चांदणं लेवते
रात्र अजुनच हिरमुसते
ताऱ्यांना खुडुन बघते
बघते कुठे दिसतो का
चंद्रही देव जाणे कुठे गेलाय
की पंधरा दिवस काम करुन
थकुन, चंदेरी दुलईत झोपलाय
तसंच असावं बहुतेक
निशाबाईंनाही ते कळतं बहुतेक
शोधते मग ती पडद्याआड
अन अन ..
शेवटी त्या दुलईत तो सापडतो
चंद्रही लगेच तिला कुशीत ओढतो
खुदकन हसुन तिही बिलगते
अन चमकन दुलईआड दडते
बहुतेक ह्यालाच आपण
तारा तुटणं म्हणत असु.. नाही का ? .

1 comment:

Jaswandi said...

mastch!
tumcha bloghi chhan ahe :)