Thursday, January 17, 2008

कोई ये कैसे बताए - स्वैर अनुवाद

"कोई ये कैसे बताए" ह्या कैफ़ी आझमींच्या सुरेख गाण्याचा मी करुन पाहिलेला एक स्वैर अनुवाद ... तुम्हास आवडेल अशी अपेक्षा..

कुणी कसे सांगावे तो एकटा का आहे
जो आपला होता तो दुसऱ्याचा का आहे

असेच हे जग तर असे हे जग का आहे
असेच जर होते तर असे होते का आहे

एकदा धरेल हात तर,ठेवेन तिचीच आस
तिज ह्रदयात सामावेल माझा हर एक श्वास
इतके जवळ असुनही हा दुरावा का आहे

भग्न या हृदयात राहतंय अजुनही कुणी
उध्वस्त घरात डोकावतंय अजुनही कुणी
आस जी तुटली कधीच , जागवते का आहे

तु आनंदाचं म्हण किंवा दुःखाचं , हे नातं
म्हणतात जन्मापार असतं हे प्रेमाचं नातं
जन्मापार जर हे नातं , तर बदलते का आहे

2 comments:

प्रशांत said...

छानच जुळून आलंय. कवितेचा उत्तम अनुवाद म्हणजे तो अनुवाद न वाटणे. तुमची ही कविता वाचून असा प्रत्यय येतो. ही कविता आणि तुमचा ब्लॉग, दोन्ही आवडलेत.
शुभेच्छा!

kedar said...

Chan translate kele aahe :)
Aani baki kavita pan sundar aahet! Aawadlya.