Saturday, January 26, 2008

देस रंगिला रंगिला - अनुवाद

नमस्कार मित्रानो .. तुम्हा सगळ्याना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा!!

'फ़ना' चित्रपटातील प्रसून जोशी लिखित 'देस रंगिला' या गाण्याचा अनुवाद तुमच्या समोर सादर करतोय ... जमल्यास मूळ चालीवर म्हणुन बघा... ...

प्रत्येक पावली इथे धरा बदलते रंग
इथल्या बोली जणु रांगोळीचे सात रंग
हिरव्या पगडीत ऋतु सजले
निळ्या चादरीत आकाश दडले
नदी सोनेरी
हिरवा सागर
गोड हा सजला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

लाल लाल गालांचा सूर्य करतो बघा खोडी
लाजर्‍या शेतांची बावरी पिवळी ही ओढणी
रंगली ओढणी
रंगीत अंगणी
रंग हा उधळला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

अबिर गुलालाचे चेहरे इथे
मस्त अशी ही टोळी
रंग हास्याचे , रंग खुशीचे
नात्यांची जणू होळी
कथांचे रंग
शपथांचे रंग
स्नेहरंग दाटला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

प्रेमाचा रंग इथे गहिरा
चढल्यावर ना उतरे
सच्च्या प्रेमाचा पक्का रंग
पसरे पण ना विखुरे
रंग साजाचा
रंग लाजेचा
सुंदर शर्मिला
देश रंगिला रंगिला
देश माझा रंगिला..

No comments: